प्रेमकथा...........

हॅलो, जान्हवी आहे का तिकडे?
हो आहे.
फोन देता का तिला जरा?
जानू सुधीरचा फोन आहे.
प्राजक्ताने आवाज ओळखला वाटतं...
ये प्राजू आई कुठेय? (जान्हवीने हळू आवाजात विचारले)
किचनमध्ये
जरा लक्ष ठेव प्लीज
मी नाही जा (प्राजक्ता लाडाने)
हो बाई आहे लक्षात, नेईन तुला त्याला भेटायला आता जा पटकन. वेळ काढण्यापुरते जान्हवीने प्राजक्ताला पटवलं.
मग ठिक आहे. प्राजक्ता किचनच्या दिशेने पळत गेली.
हा बोल सुधीर एवढया दुपारचा फोन कशासाठी केलास?
आधी सांग पाहू हि तुझी बहिण मला नावासहीत कशी ओळखते? सुधीरने थोडं गंभीर होऊन विचारलं.
हो मीच तिला सांगितलं, तिनं एकदा माझ्या नोटबूकमधलं तुझं पत्र वाचलं होतं. जान्हवीने थोडया नरम आवाजात त्याचं उत्तर दिलं.
अग पण काही भीती... तिनं घरात सांगितलं तर?
काही नाही तेवढं तिला कळत. मी तिला सगळं खरं सांगितलंय आणि समजवलंयही.
आणि फोन कशासाठी केला म्हणजे? (सुधीर)
अरे, तसं नाही या वेळेस तुझा फोन येत नाही म्हणून विचारलं यात एवढं रागवायचं काय त्यात.
जान्हवी तू ऐकलं असशील प्रेम हे आंधळ असतं, पण मला वाटतं ते मनोरुग्णही असतं.
हो का मला आत्ताच कळलं. जान्हवी त्याची फिरकी घेत म्हणाली. सायकोलॉजीच्या मिसनं आज तुझा एक्स्ट्रा पिरियड घेतला वाटतं.
वा, हे तुझं बरं आहे जान्हवी, मी इथे चातक होऊन बसलोय आणि तू माझी फिरकी घेतेस.
नाही रे प्रेमात तेवढं चालतं, तुला चातक वैगरे काही बनायची गरज नाही हा आणि मी काय माझं संपूर्ण जीवन एखाद्या पक्षाबरोबर जगायचं. पुन्हा जान्हवीने त्याची फिरकी घेतली.
हे मात्र आता फार झालं. सुधीर थोडा रागातच म्हणाला.
ये जानू कुणाशी इतका वेळ बोलतेस? कुणाचा फोन आहे? (आईने संशयास्पद विचारलं)
सुधी... नाही सुमिक्षा, सुमिक्षाचा फोन आहे. फोनच्या माईकवर हात ठेवून जान्हवीने अडखळत उत्तर दिलं.
जान्हवीने हळू आवाजात विचारलं, अरे पटकन सांग फोन कशाला केलास ते?
आज संध्याकाळी पार्कमध्ये येशील ना?
प्राजू कोण आहे गं फोनवर?
सांगितलंना आई तिने तुला सुमिक्षा आहे म्हणून... ती कसले तरी नोटस मागतेय तिच्याजवळ. तेवढ्या पुरतं प्राजूने आईला पटवलं.
जानू, ये जानू... आईने पुन्हा आवाज दिला.
हो आई येते. सुधीर निघताना मी तुला रिंग करेन. चल ठेवते बाय... आणि जान्हवीने फोन ठेवून दिला.
अर्धा तास झाला हिच्या रिंगचा काही पत्ता नाही... आजकाल हिची उडवा-उडवीची उत्तरं असतात. भेटायला आली की नीट बोलतही नाही. विचारलं पुढे काय करण्याचा विचार केलायस? आई बाबा सांगतील तेच करायचं. सुधीर विचारपुर्वक स्वत:शीच बोलत होता. मी हिला निवडण्यात काही चूक तर केली नाही ना? मोबाईलकडे पाहत सुधीर पुटपुटत होता.
इतक्यात फोन वाजला. नक्कीच जान्हवीचा होता.
काही वेळ सुधीर पार्कला घिरट्या घालत होता.
हाय सुधीर! पाठीवर जान्हवी चापट मारून हसत होती.
ओ हाय, तुझीच वाट पाहत होतो (खोटं हसत)
साहजिक आहे, पहावीच लागणार चातक नाही का तू?
जान्हवीचं बोलणं सुधीरच्या मनाला टोचून गेलं, पण तो काहीच बोलू शकत नव्हता because his first love in his life…
ओळख करून देते तुझी, तूच ओळख – जान्हवी.
पाहू (जान्हवीने कोडयात विचारलं)
मला कसं कळणार असेल तुझी मैत्रीण.
तीन बोटांनी सुधीरच्या कपाळाला धक्का देत जान्हवी म्हणाली, अरे तुझ्या सायकोलॉजीचा कधी वापर करतोस की नाही.
ये असं काय म्हणतेस तू त्याला जानू. प्राजक्ताने जान्हवीचा हात आवरत म्हणाली.
हि माझी बहिण माझ्यापेक्षा तीन मिनिटांनी लहान आहे - जान्हवी म्हणाली.
Hi nice to meet you – प्राजक्ता.
Same here – सुधीर. तीन मिनिटांनी लहान म्हणजे? I can’t understand means you are twins?
हो आम्ही जुळ्यातल्या – प्राजक्ता स्मितहास्य फुलवत म्हणाली.
तुम्ही सगळे हिला घरात कसं काय सहन करत असाल देव जाणो. पाहिलंस ना प्राजक्ता तू? सुधीरनं टोला दिला.
अरे, जसं रोज तू सहन करतोस तसंच – प्राजक्ता हसत म्हणाली.
म्हणजे तुम्ही दोघीही सारख्याच तर...
आणि हो प्राजक्ता हाच तो सुधीर नावाचा दगड. इतक्या मुली सोडून माझ्या गळ्यात पडलाय.
आणि एकदम तिघांच्याही चेहऱ्यावर हास्य लहरी उमटल्या.



- सुनिल संध्या कांबळी.

No comments: