प्रेम

कुणीतरी असा विचार केला असेल का की आपल्या आयुष्यात जीवनावश्यक वस्तूंची गरज का असावी तर लगेचच उत्त्तर मिळेल ‘जगण्यासाठी’. नेमकं जगणं म्हणजे तरी काय? याचा उलगडा करण्याच्या मी प्रयत्नांत.

मनुष्याने जर जन्म घेतलाच आहे तर त्याचा अंत ही निश्चित आहे पण त्याने त्या कालावधीत काय प्राप्त केले आणि काय प्राप्त करावयास हवे यावर आधारित काही मुद्दे...

स्वत:च्या उपभोगासाठी (उपयोगासाठी) त्याने जीवनावश्यक वस्तूंची निर्मिती तर केली आणि त्याचा विनाशही तोच करणार आहे. असो, पण त्याच्या अंगी असणारा कर्तुत्वपणा, ध्येयनिष्ठता यांवर त्याच्या आयुष्याची खरी परीक्षा आधारित असते. मानवाला परमात्माने सुख, दुःख, यातना यांची जशी जाण दिली आहे तशाच प्रकारे त्याला संवेदनशीलता, दृढसंकल्पना याचेही ज्ञान दिले आहे. परंतू ते ज्ञान आपण कोणत्याप्रकारे आत्मसात करावे हे आपणच ठरवावे. त्याचबरोबर त्याने आपल्यामध्ये सुंदर अंत:करण व सखोल विचार क्षमता रुजवली आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेत असता एक लक्षात येते की आपल्याला पुढील भावी आयुष्यात अधिक आनंद देऊ शकते. असो, एकंदर सर्व गोष्टींचा विचार केला असता मानवजातीला भेडसावणाऱ्या प्रचंड प्रश्नांचे निदान करण्यात वेळ घालवत नाही. त्याच्या मनात एक दुसऱ्याबद्दलची भावना, संकल्पना त्या कुठल्याही प्रकारच्या असोत, त्या वाईटच असतात असं नाही, चांगल्यासुद्धा असतात. त्या आपल्या मनात सदगुणता, आपुलकी, करुणा, शांती यांचे भाव जागृत करतात. यावरून आपणाला लक्षात आलेच असेल की यामागे कोणतातरी किंतू असावा. त्याचे संक्षिप्त रुपात सांगावयास गेलो तर ते म्हणजे ‘प्रेम’. त्याला ज्या दृष्टीकोनातून पहाल त्याच दृष्टीकोनातून ते तुम्हांला आत्मसात करता येईल. आयुष्यात एकदातरी खऱ्या अर्थाने प्रेमाची जाणीव होणे गरजेचे आहे. अनेकांच्या मनात प्रेम हे एक ‘फॅड’ असले तरी त्यामागील भावना काय असल्या पाहिजेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असता आपल्या डोक्याभोवती विचारांची मक्षिका गोंगावू लागते. पुढे हृदयात संकल्पनेचे दरवाजे ठोठावू लागतात. असो, पुढे प्रेमाचा विचार केला असता त्याचे बरेचसे अर्थ काढता येतात. पण खऱ्या अर्थाने सांगायचे झाले तर ‘प्रेम’ हे भक्ती, भावना, श्रद्धा, पावित्र्यता, निर्मळता, शांती, स्वरूपतेचे प्रतिक मानले जाते आणि याबाबतीत सदर गोष्टींचा उपभोग फक्त मानवच घेवू शकतो. अशाच एका दृष्टीकोनातून पाहता मानव आंतरभावातून कितीही द्वेषी, घृणा, अनैतिकतेने वागत असला तरी त्याला प्रेमाची एक लहर ढासळून टाकते. यामागील कारण तरी काय असेल? आपली विचारक्षमता की आपले अंत:करण? माझ्या मते प्रेम ही अशी सदभावना आहे की ती कोणालाही सहज संबोधीत केली जाते. जरी तो आपला ईश्वर असो वा आपली आई असो. आपण जे कोणतेही कृत्य करतो त्याचा उगम आपल्या दृष्टीकोनातून होत असतो.

- सुनिल संध्या कांबळी.



No comments: