प्रेमाच्या अंधारात

प्रेमाची सुरुवात नेहमी वेद्नेनेच का होते...?

मग ती वेदना सुखद असो वा दुःखद. स्थिर पाण्यावर एखाद्या झुडपाच पान पाडावं अन पाण्यावर तरंग उठावे ... अशीच काहीशी माझी अवस्था होती.

हेरवी शांत असणारं चंचल मन, अस्थिर व्हावं आपण काय करतो आहोत याचे परिणाम काय होतील याची जाणीवही आपल्याला होत नसते.

सुखद प्रेमाचा सहवास माझ्या वाट्याला कधी आलाच नाही. माझ्या आसपास होत्या त्या फक्त वेदनाच. प्रेम समजून मी एक एक वेदना अनुभवत होते. एका एकी मला वेदनेच व्यसन झालं आणि मी त्या वेदनेची रुग्ण झाले. माझी सुरुवात प्रेमातूनच झाली होती, पण त्यानंतरच सारंकाही वाळवंट होतं.

माझ्या सौभाग्याची सुरुवात छळानेच झाली अंगावर कापडं कमी अन् वणच जास्त असायचे दिवसा आड डोळ्यातली विहिर आटत होती. सौभाग्य म्हणून त्याच्या नावाचा कळा धागा गळ्यात बांधला होता त्याची गाठ मात्र घट्टच होती... आपण फक्त वाट पहायची... या आशेवर जगायचं, त्याच्या कळा सोसत त्याची भूक मिटवायची प्रेमाच्या गडध अंधारात जगायचं... इतकचं असत प्रेम !

आजवर मला प्रेमाची इतकीच व्याख्या कळाली होती. गळ्यातला धागा विरळ होत होता मात्र गाठ तशीच घट्ट होती. कालांतराने एक जिवंत खेळन माझ्या पदरात टाकून माझ प्रेम विरळ होऊन गेलं. आता पुन्हा प्रेमात पडायचं, जुनाट जखमा लवकरच भरायला हव्यात, वण लवकरच पुसायला हवेत... पुन्हा कधी विहिर भरून येईल कुणाच ठाऊक...

No comments: